नवी दिल्ली : टीम इंडियाने न्यूझीलंडला शेवटच्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात ६ रन्सनी मात देत सीरिजवर कब्जा केला. न्यूझीलंड विरूद्धच्या टी-२० सामन्यासाठी दोन नव्या खेळाडूंना संधी देण्य़ात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात एक होता श्रेयस अय्यर आणि दुसरा मोहम्मद सिराज. पहिल्याच सामन्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना मोहम्मद सिराजच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यानंतर विजयची ट्रॉफी उचलूनही सिराज भावूक झाला. 




टी-२० सीरिजमध्ये विजयाची ट्रॉफी हाती घेतल्यावर गोलंदाज सिराज भावूक झाला. विजयानंतर कर्णधार विराट कोहली याने ट्रॉफी मोहम्मद सिराजच्या हाती दिली, तेव्हा तो पुन्हा एकदा भावूक झाला आणि त्याचे डोळे भरून आले.



सिराजने तो खास क्षण ट्विटरवर शेअर करून झालेला आनंद व्यक्त केला. सिराजने हातात ट्रॉफी घेतलेला फोटोही शेअर केला. त्याने लिहिले की, ‘टीम इंडियासाठी मी पहिल्यांदाच ट्रॉफी उचलणे हा क्षण अभिमानाचा आहे. जय हिंद’.




सिराजने याच सीरिजच्या दुस-या सामन्यातून आंतरराष्ट्रीय डेब्यू केलं होतं. त्याने ४ ओव्हर्समध्ये ५३ रन्स दिले. केवळ एकच विकेट घेतली होती.