IND vs AUS Sydney Test : राष्ट्रगीताच्यावेळी Mohammed Siraj भावूक : Watch Video
या कारणासाठी सिराज झाला भावूक
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) चा तिसरा टेस्ट सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)च्या करिअरमधील हा दुसरा टेस्ट सामना आहे. गुरूवारी सामना सुरू होण्याअगोदर तो भरपूर इमोशनल झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.
मोहम्मद सिराज भावूक
सिडनी टेस्ट सुरू होण्याअगोदर भारताचे राष्ट्रगीत (National Anthem) सुरू झालं. तेव्हा सर्व खेळाडूंसोबत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) देखील मैदानात उपस्थित होता. राष्ट्रगीत सुरू होताच युवा गोलंदाज अतिशय भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सिराज करता हा कधीही भावूक क्षण होता.
मेलबर्न टेस्ट दरम्यान डेब्यू मोहम्मद शमी (Mohammed Shami) ला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ला मेलबर्न टेस्टमध्ये (Melbourne Test) पदार्पण करण्याची संधी मिळाली. सिराजने या मॅचमध्ये ५ विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला निराश केलं.
वडिलांच्या जाण्याचं दुःख या टूर दरम्यान मोहम्मद सिराजच्या वडिलांच दुःखद निधन झालं. ज्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियात थांबण्याचा निर्णय घेतला. सिराजने आपल्या आईशी फोनवर संवाद साधला. त्यावेळी त्यांची आई म्हणाली,'तेच कर जे तुझ्या वडिलांची इच्छा होती. भारतासाठी खेळ.' मोहम्मद सिराज प्रत्येक सामन्यादरम्यान वडिलांची आठवण काढतो.