Mohammed Siraj Phil Salt Fight: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या शाब्दिक भांडणामुळे क्रिकेटच्या प्रतिमेलाही डाग लागला. तर आयपीएलच्या सन्माला देखील गालगोट लागल्याचं दिसून येतंय. विराट आणि गंभीरच्या भांडणात 'कळीचा नारद' ठरला तो मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. अशातच आता मोहम्मद सिराजने यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) तिसऱ्यांना मोठी चूक केली आहे. सिराजने यंदाच्या हंगामात तीन वेळा भांडणाचं मुळ उघडून काढलंय.  दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात झालेल्या सामन्यात सिराजने पुन्हा वाद घातल्याचं दिसून आलंय.


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद सिराज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि फिल सॉल्ट (Phil Salt) यांच्याशी वाद झाल्याचं दिसून आलंय. सामन्यात गोलंदाजी करताना सिराजला (Mohammed Siraj) जबर चोप बसला. सिराजच्या दुसऱ्या षटकात सॉल्टने सलग दोन षटकार आणि नंतर चौकार मारले. त्यामुळे सिराज चिडल्याचं दिसून आलं. त्यानंतरचा बॉल सिराजने बाऊंसर केला. त्यावर अंपायर्सने वाईट बॉल सिग्नल दिला. त्यानंतर सिराज आणखीच भडकल्याचं दिसून आलं.


फिल सॉल्ट आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj Phil Salt Fight) दोघांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या सिराजनेही सॉल्टकडे बोट दाखवलं आणि रागात पाहिलं. पंच आणि दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कॅप्टन फाफ डुप्लेसीसने समोर येत दोघांची भांडणं मिटवली. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पाहा Video



रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) सामन्यात सिराजने स्वत:च्या टीममधील महिपाल लोमरोर (Mahipal Lomror) याच्यावर संताप व्यक्त केला होता. लोमरोरचा थ्रो थोडासा चुकला अन् त्यामुळे सिराजला चेंडू पकडता आला नाही. त्यामुळे सिराजचा पाय स्टंप्सला लागला होता. त्यावेळी लोमरोरवर सिराज संतापला होता. त्यानंतर त्याने माफी देखील मागितली होती.


आणखी वाचा - Mohammed Siraj: 'सॉरी मला माफ कर...', अखेर 'त्या' कृत्यावर सिराजने खुलेआम मागितली माफी; पाहा Video


मी खूप रागीट माणूस आहे. मला माफ कर, काय नाव महिपाल, कृपया मला माफ कर. मी दोनदा माफी मागितली आहे. तो राग फिल्डपर्यंतच राहतो, त्यानंतर माझा राग शांत होतो, असं सिराज (Mohammed Siraj) यावेळी म्हणाला होता. त्यानंतर आज पुन्हा सिराजने सॉल्टशी पंगा घेतल्याचं दिसून आलंय.