कानपूर : भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगलं काम करतेय. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय अवघ्या एका विकेटने हुकला. दरम्यान राहुल द्रविड यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सर्वोत्तम खेळपट्टी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 35,000 रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलंय.


द्रविडने ग्राउंड्समना दिलं बक्षिस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सामना संपल्यानंतर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने खेळानंतर प्रेस बॉक्समध्ये घोषणा केली, 'आम्हाला अधिकृत घोषणा करायची आहे. राहुल द्रविडने वैयक्तिकरित्या आमच्या ग्राउंड्समनला 35,000 रुपये दिले आहेत.


द्रविडने असं का केलं?


राहुल द्रविड त्याच्या चांगल्या खेळासाठी एका काळात ओळखला जायचा. ग्राउंड्समनना मिळालेलं बक्षिस हे या वस्तुस्थितीचं प्रतीक होतं की, सामन्याच्या पाचव्या दिवशी खेळपट्टीवर गोलंदाज आणि फलंदाजांसाठी काहीतरी खास होतं.


पिचवर स्पिनर्सना मिळाली मदत


या खेळपट्टीवर श्रेयस अय्यर, शुभमन गिल, टॉम लॅथम आणि विल यंग यांसारख्या फलंदाजांनी उत्कृष्ट तंत्र दाखवून रन्स केले. तिथे टीम साऊथी आणि काइल जेमिसनसारख्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या टॉप ऑर्डरला अडचणीत आणलं. खेळपट्टीनेही भारतीय फिरकीपटूंना मदत केली.


या खेळाडूंनी ड्रॉ केला सामना


भारतातील एजाज पटेल आणि भारतीय वंशाच्या रचिन रवींद्र यांनी सोमवारी कानपूर कसोटीत कमालीचा संयम दाखवला. यावेळी शेवटची विकेट वाचवून न्यूझीलंडला पराभूत होण्यापासून वाचवलं.