T20 World Cup 2024 Prize Money: भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यात विजयी ठरणारी टीम टी-20 वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. टीम इंडिया यावेळी आयसीसी ट्रॉफींचा दुष्काळ संपवणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने शेवटचे 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तेव्हापासून ते सतत पराभूत होत आहेत. तर दक्षिण आफ्रिकेकडे अद्याप कोणतेही विजेतेपद नाही. ती प्रथमच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत अंतिम सामना खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टीम या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिल्या आहेत. आज संध्याकाळी जेव्हा हे टीम एकमेकांसमोर येतील तेव्हा ट्रॉफीसोबत खेळाडूंच्या नजरा बक्षिसाच्या रकमेवरही असतील. या मेगा इव्हेंटच्या विजेत्याला मिळालेली बक्षीस रक्कम ही T20 वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वाधिक असणार आहे. विजेत्या आणि उपविजेत्या व्यतिरिक्त, प्रत्येक सहभागी टीमला बक्षिस मिळणार आहे. यावेळी कोणाला किती रक्कम मिळणार आहे ते पाहूयात.


फायनल सामना जिंकणाऱ्या टीमला किती रूपयांचं मिळणार बक्षिस?


फायनल सामन्यातील विजेत्याला 2.45 मिलियन डॉलर म्हणजेच 20.42 कोटी रुपये मिळतील.


टी 20 वर्ल्डकपची 2024 च्या उपविजेता टीमला किती मिळणार धनराशी?


अंतिम फेरीत पराभूत झालेल्याला विजेत्याच्या अर्ध्या रकमेची म्हणजे $1.28 दशलक्ष म्हणजेच रु. 10.67 कोटी मिळतील.


T20 वर्ल्डकप 2024 च्या सेमीफायनल फेरीतील खेळाडूंना किती पैसे मिळणार?


उपांत्य फेरीतील इंग्लंड आणि अफगाणिस्तान, ज्यांनी दोन्ही सामने गमावले, त्यांना $787,500 म्हणजेच 6.56 कोटी रुपयांचं बक्षिस मिळेल.


सुपर 8 मधून बाहेर पडलेल्या संघांना किती पैसे मिळतील?


सुपर 8 फेरीनंतर बाहेर पडलेल्या टीमना $382,500 म्हणजे 3.18 कोटी रुपये मिळणार आहे.