क्रिकेटच्या दुनियेत अनेक विक्रम होत असतात. हा खेळच असा आहे की यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अगदी शेवटच्या क्षणालाही काहीही होऊ शकतं. या खेळातील काही विक्रम इतके दुर्मिळ आहेत की त्यावर तुमचा सहज विश्वास बसणार नाही. असाच एक विश्वविक्रम आहे जो अजूनही कोणी मोडू शकलेलं नाही. हा विक्रम वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज फिल सिमन्सच्या (Phil Simmons) नावावर नोंदवला गेला आहे. फिल सिमन्सने 17 डिसेंबर 1992 रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात कंजूस गोलंदाजीचा विश्वविक्रम रचला. हा विक्रम इतिहासात नोंदवला गेला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फिल सिमन्सचा हा दुर्मिळ विश्वविक्रम 32 वर्षांपासून आजवर जगातील कोणत्याही गोलंदाजाने मोडलेला नाही. आजच्या काळात जसप्रीत बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला हा दुर्मिळ विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे.


कसा झाल हा  विश्वविक्रम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोलंदाज फिल सिमन्सने 17 डिसेंबर 1992 रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामना खेळला. यावेळी त्याने त्या सामन्यात 10 षटकात फक्त 3 धावा देऊन 4 बळी घेतले. या कालावधीत फिल सिमन्सचा इकॉनॉमी रेट 0.30 आहे. हा विक्रम करून गोलंदाज फिल सिमन्सला 32 वर्ष झाली. पण आजही फिल सिमन्सचा हा विश्वविक्रम मोडणे कोणत्याही गोलंदाजाला शक्य वाटत नाहीये. विशेष म्हणजे या कालावधीत फिल सिमन्सने आठ मेडन ओव्हर्स टाकल्या, ज्यामुळे त्याचा गोलंदाजीचा आकडा 10-8-3-4 होता. हा विश्वविक्रम अशक्यच्या पुढे आहे. अतिआक्रमक T20 आणि ODI क्रिकेटच्या या आधुनिक युगात हा विश्वविक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे.


हे ही वाचा: "भरोसा करो भाई " सरफराज खानने रोहित शर्माला DRS घेण्यास पटवले, अन्.. बघा viral video


फिल सिमन्सचा विक्रम


फिल सिमन्स हा वेस्ट इंडिजचा उत्कृष्ट वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे. फिल सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी 143 एकदिवसीय सामन्यांमध्ये 28.94 च्या सरासरीने 3675 धावा केल्या आहेत. फिल सिमन्सने वनडेमध्ये 5 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत. त्याचवेळी, कसोटी क्रिकेटमध्ये फिल सिमन्सने 26 सामन्यांत 22.27 च्या सरासरीने 1002 धावा केल्या आहेत.


हे ही वाचा: रविचंद्रन अश्विनचे ​​नाव इतिहासाच्या पानात नोंदवले जाईल, शेन वॉर्नचा 'हा' 18 वर्ष जुना विक्रम मोडण्याच्या आहे जवळ


फिल सिमन्सने एकदिवसीय सामन्यात 83 आणि कसोटीत 4 बळी घेतले आहेत. फिल सिमन्स हे दोन वेळा वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक राहिला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कॅरेबियन संघाने 2016 मध्ये T20 विश्वचषक जिंकला होता.