Most International Runs in 2021: सर्वात जास्त धावांमध्ये दुसरा पंत तर तिसरा हिटमॅन, मग पहिला कोण?
नुकतीच ऋषभ पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सची धुरा IPLपूर्वीच आली आहे.
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड तीन फॉरमॅटमधील सामने नुकतेच पार पडले. या सामन्यांनंतर सर्वात्र चर्चा होती ऋषभ पंतनं केलेल्या दमदार कामगिरीची. कसोटी असो किंवा वन डे ऋषने आपल्या फलंदाजीनं कमाल केली. कोहली, रोहित शर्मा यांनी अनेक विक्रम जरी आपल्या नावावर केले असले तर त्यांचीही पुढे एका बाबतीत पंत पोहोचला आहे.
नुकतीच ऋषभ पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सची धुरा IPLपूर्वीच आली आहे. ऋषभ पंतच्या कामगिरीचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे. एक साधारण विचार करायचा झाला तर 2021मध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघातील फलंदाजांमध्ये पंतने जास्त धावा केल्या आहेत.
थोडक्यात सांगायचं तर 2021 या वर्षात आतापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये ऋषभ पंतने एकूण 772 धावा केल्या. त्यानंतर हिटमॅन रोहितचा क्रमांक लागतो. तिसऱ्या स्थानावर असलेल्या रोहितनं 655 धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानावर विराट कोहलीचा क्रमांक आहे. कोहलीनं 532 धावा केल्या आहेत. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे याची उत्सुकता आता असेल तर पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा खेळाडू नाही.
इंग्लंडचा फलंदाज जो रूटनं 794 धावा केल्या आहेत. जो रूट पहिल्या स्थानावर आहे. ऋषभ पंतने 772 तर जो रुटने 794 धावा करत पहिलं स्थान मिळवलं आहे. ऋषभ पंत आपल्या हटके स्टाइलनं फलंदाजी करण्यासाठी खूप प्रसिद्ध तर आहेच याशिवाय टीममधील खेळाडूंचा उत्साह मैदानात वाढवण्यासाठी देखील तो करत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. कसोटी आणि टी 20मध्ये विराट कोहलीला जास्त धावा करता आल्या नाहीत मात्र त्याची कसर वन डे सीरिजमध्ये कोहलीनं भरून काढली.