मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबरपासून वनडे क्रिकेट सुरू होईल. टीम इंडिया आधी तीन सामन्यांची वनडे मालिका, त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि शेवटी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा वनडे सिरीज खेळणार नाहीये. रोहित संघात नसल्यामुळे विराट कोहलीची जबाबदारी वाढणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची वनडेतील कामगिरी चांगली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला त्याची उणीव नक्कीच जाणवेल. कारण ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करण्याची गोष्ट असेल तर रोहित शर्मा सध्या आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट कारकिर्दीत रोहितने एकदिवसीय सामन्यात 990 धावा केल्या. सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यात कांगारू संघाविरूद्ध 400 धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.


विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात वनडे सामन्यांमध्ये 629 धावा केल्या असून या तो चौथ्या स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनी 684 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


990 - रोहित शर्मा
740 - सचिन तेंडुलकर
684 - एमएस धोनी
629 - विराट कोहली


एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. या संघाविरुद्ध सचिनने 71 सामन्यांत 3077 धावा केल्या, तर रोहित शर्मा हा दुसर्‍या स्थानावर आहे. रोहितने कांगारू संघाविरुद्ध 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2208 धावा केल्या आहेत, तर विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे आणि त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1910 धावा केल्या आहेत.