मुंबई : मध्य प्रदेशातील भिलांचल भागातील अत्यंत पौष्टिक ब्लॅक चिकन प्रकारातील कडकनाथने कॅप्टन कूल एमएस धोनीचं मन जिंकल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता महेंद्रसिंह धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करेल. धोनीने मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या २ हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डरही दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाबुआ जिल्ह्यातील थांदला खेड्यातील रहिवासी शेतकरी विनोद मेधा, रांचीतील धोनीच्या टीमला २००० कडकनाथ पिल्लांची पुरवठा करण्याची १५ डिसेंबरची मुदत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. विनोद यांना आशा आहे की, जेव्हा ते रांची येथे कडकनाथ पिल्लांची डिलिव्हरी देण्यासाठी जातील तेव्हा ते धोनीसारख्या व्यक्तीला भेटतील.



तीन महिन्यांपूर्वी धोनीचे शेती सांभाळणारे मॅनेजर कृषी विकास केंद्र आणि एमपी केदारनाथ मोबाईल ऍप द्वारे संपर्कात आले. पाच दिवसांपूर्वी त्यांनी २ हजार कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर केली. धोनीला कोंबड्यांची डिलिव्हरी करण्यासाठी विनोद अतिशय उत्साही आहे. 


१५ ऑगस्ट २०१९ मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. जुलै २०२० मध्ये धोनीचे ४३ एकर शेतीत शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे धोनीची टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरली आहे. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या आहेत. तसेच मत्सोद्योगात, बदक पालन आणि पोल्ट्री फार्ममध्ये देखील धोनीने गुंतवणूक केली आहे.