नवी दिल्ली : विविध प्रकारच्या खेळांमध्ये अनेकांचीच रुची असते. अमुक एक खेळ म्हणजे आपलं सर्वस्व;  असं सांगणारे अनेकजण आपल्याला भेटतात. लॉन टेनिस या खेळावर असंच नितांत प्रेम करणारं एक जोडपं सध्या साऱ्या जगाचं लक्ष वेधत आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल़्डन या स्पर्धेच्या आयोजकांकडूनही या जोडीची दखल घेण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रीडा विश्वात सध्या चर्चा सुरु आहे, ती म्हणजे क्रिकेट विश्वचषकाची आणि विम्बल्डन स्पर्धेची. सोमवारपासून सुरु झालेल्या विम्बल्डन स्पर्धेनंतर क्रीडा विश्वात हे सारं वातावण चांगलच रंगताना दिसत आहे. यादरम्यानच फेसबुकच्या माध्यमातून हैदराबादच्या व्यंकटेशन आणि त्यांच्या पत्नी गौरी व्यंकटेशन यांचा अनोखा प्रवास सर्वांपर्यंत आणला आहे. मुख्य म्हणजे या जोडीचा उत्साह पाहता, वयाचा आकडा कधीच आपल्या आवडीच्या गोष्टींच्या आड येत नसतो हेच स्पष्ट होत आहे. 


टेनिस विश्वात अग्रगणी असणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेच्या सेंटर कोर्टवर एकदा तरी टेनिसचा सामना पाहण्याचं त्यांचं स्वप्न होतं. जे अखेर पूर्णत्वास गेलं आहे. या क्षणाचा आनंद व्यंकटेशन दाम्पत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळत आहे. आपल्या मुलाने या खेळात किंबहुना विम्बल्डनमध्ये खेळावं अशी त्या दोघांचीही इच्छा होती. पण, काही कारणास्तव गोष्टी शक्य झाल्या नाहीत.