इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरी वनडे होतेय. होळकर मैदानात हा सामना रंगतोय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. मालिकेतील हा आजचा सामना जिंकल्यास भारत मालिका विजय मिळवू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यांत धूळ चारल्यानंतर भारताचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय. या आत्मविश्वासह टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने शनिवारी होळकर मैदानात जोरदार सराव केला. यासरावादरम्यान माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बॉलिंग करताना दिसला.


बीसीसीआयने याबाबतचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय. यात कुलदीप यादव आणि अक्षऱ पटेलसह धोनीही बॉलिंग करताना दिसतोय. व्हिडीओत धोनी ऑफ-ब्रेक आणि लेग-ब्रेक बॉलिंग करताना दिसत आहे. याआधीही धोनीने बॉलिंग केलीये. मात्र स्पिन बॉलिंग करताना पहिल्यांदाच दिसला.