IndvsNz| मैदानात येताच धोनीची विश्वविक्रमाला गवसणी
धोनीने आतापर्यंत ५९४ डावांमध्ये विकेटकिपींग करण्याचा विक्रम केला.
हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या व मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताचा ४ धावांनी निसटता पराभव झाला आहे. ही मालिका भारतानं २-१नं गमावली आहे. भारताचा पराभव झाला असेल तरी तिसऱ्या सामन्यात धोनीच्या नावे नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. आजच्या सामन्याची सुरुवात होताच धोनीच्या नावे एक विक्रम झाला आहे. टी-२० प्रकारातील धोनीचा हा ३०० वा सामना होता.
३०० सामने खेळणारा धोनी हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच धोनीने आतापर्यंत ५९४ डावांमध्ये विकेटकिपींग करण्याचा विक्रम केला. धोनीने हा विक्रम ५२४ व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात केला आहे. याप्रकारचा विक्रम करणारा धोनी हा क्रिकेट विश्वातील दुसराच खेळाडू ठरला आहे.
धोनीची स्टंपिंग
धोनीने किपींग करताना अनेकदा आपली हुशारी दाखवून दिली आहे. धोनीने स्टंपच्यामागे केलेल्या प्रत्येक प्रयोगांमध्ये तो यशस्वी होतो. धोनीने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अशाच प्रकारे न्यूझीलंडच्या टीम सायफर्टला ४३ धावांवर स्टंपिंग करत बाहेरचा रस्ता दाखवला.