मुंबईः कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात  पराभव झाल्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली जात आहे. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात धोनी उत्तम कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या ६ वर्षाच्या लेकीला सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी मिळत आहे. अवघ्या ६ वर्षाच्या झिवाला बलात्काराची धमकी मिळाल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावण निर्माण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यात १० धावांनी पराभव झाल्यामुळे धोनीची पत्नी साक्षी रावतच्या इन्स्टाग्रामवर झिवाबद्दल अनेक आक्षेपार्ह कमेंट येत आहेत.  या घटनेवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय धोनीच्या चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. 




दरम्यान, देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात एक स्त्री सुरक्षित नसल्याची वास्तव समोर आहे. घरा बाहेरच नाही तर आता सोशल मीडियावरून देखील मुलींना बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. हे कृत्य माणुसकीला काळीमा फसणारं असल्याचं वक्तव्य देखील अनेक नेटकऱ्यांनी याठिकाणी केलं आहे.