पुणे : क्रिकेट जगतामध्ये भारताचा माजी कर्णधार धोनीचे असंख्य फॅन्स आहेत. क्रिकेटचा देव मानला गेलेल्या सचिन तेंडुलकरनंतर भारतात कदाचित धोनीचेच फॅन सर्वाधिक असतील. आयपीएलचा रोमांच सध्या जोरावर आहे. यातच चेन्नईच्या टीमनं दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक केलं आहे. चेन्नईकडून खेळताना धोनीही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे धोनीचे फॅन्स त्याच्यावर भलतेच खुश आहेत. दिल्लीविरुद्धच्या मॅचसाठी पुण्याच्या स्टेडियममध्ये जात असताना धोनीचा असाच एक फॅन पाहायला मिळाला. या फॅनमुळे पुण्याच्या रस्त्यांवर ट्रॅफिक झाला होता. चेन्नईच्या टीमची बस रस्त्यावरून जात असताना हा फॅन बाहेरून धोनीचं पोस्टर हातात घेऊन बसबरोबर चालत होता. चेन्नईचा प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगनं हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या फॅनची असं करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी मुंबई आणि चेन्नईच्या मॅचवेळीही असाच एक फॅन दिसला होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये हा व्यक्ती मुंबईला सपोर्ट करण्यासाठी आला होता पण धोनी मैदानात आल्यावर या फॅननं चेन्नईचा टी शर्ट घातला आणि धोनी-धोनी म्हणून ओरडू लागला. 



चेन्नई आणि बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये एक महिला बंगळुरूला सपोर्ट करण्यासाठी आली होती पण जेव्हा धोनीनं सिक्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली तेव्हा तिनं चेन्नईला पाठिंबा द्यायला सुरुवात केली.



धोनीबद्दल पोस्टर घेऊन आलेल्या एका महिला फॅनचा फोटो तर आयसीसीनं ट्विट केला होता.



हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादला सपोर्ट करणारा फॅन धोनीलाही सपोर्ट करताना दिसला होता.