नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणजेच भारतीय क्रिकेटच्या सरपेचातील मानाचा तुरा होय. त्यांनी आपल्या आदर्श कामांमुळे अनेकदा लोकांचे मन जिंकले आहे. परंतु नुकतेच धोनी यांनी असे काम केले आहे की, ज्यामुळे तुम्हालाही कौतुक वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच धोनींनी एका चनेवाल्या काकांचे पैसे न दिल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर धोनी यांनी असं काही केलं की, तुम्हालाही कौतुक वाटेल. त्या चनेवाल्या काकांच्या हातगाडीवर 35 हजार रुपये ठेऊन धोनी गुपचूप निघून गेले. या चनेवाल्या काकांचेही नाव महेंद्र असेच आहे.


धोनी लहानपणापासून ज्या मैदानावर क्रिकेट खेळत असत. तेथे एक चनेविक्रेते महेंद्र काका होते. धोनी लहानपणी अनेकदा त्यांच्याकडे चने खाण्यास येत असे. आता धोनी जगप्रसिद्ध व्यक्ती आहेत. परंतु त्यांना आपल्या लहानपणीच्या चनेवाल्या काकांचा विसर पडलेला नाही. नुकतेच धोनी यांनी चनेवाल्या काकांचे पैसे थकवल्याची मिश्किल माहिती समोर आल्यानंतर, धोनी यांनी देखील काकांना मोठी मदत देऊन खुश केले आहे.


 


बाबत एका युट्यूबरशी बोलताना चनेवाले काका म्हणाले की,'धोनीने कधीही उधार चने खाल्ले नाहीत. ते नेहमीच पैसे देऊन जात असत. तसे तर मी धोनीला भेटायला हवे होते. परंतु ते आज स्वतः मला येऊन भेटून गेले. ते जेव्हाही चने खात असतील तेव्हा माजी आठवण काढत असतील.'