मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दुबई  क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरु करतोय. तशी घोषणा धोनीने 'गल्फ न्यूज' वाहिनीशी बोलताना केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने आता दुबईत क्रिकेट प्रशिक्षण अकादमी  सुरु केल्यामुळे येथील तरुणांना क्रिकेटची गोडी निर्माण होणार आहे. संयुक्त अरब आमिरातीतील (यूएई) दुबई पॅसिफिक स्पोर्टस् क्लबच्या (पीएससी) सहकार्याने ही अकादमी सुरु होत आहे. जागतिक क्रिकेटचे एक प्रमुख केंद्र बनलेल्या दुबईत एम. एस. धोनी क्रिकेट अकादमी (एमएसडीसीए) सुरू करण्याची घोषणा पॅसिफिक व्हेंचरचे प्रमुख परवेझ खान यांनी देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केली.


धोनीने धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या पावलावर पाऊल ठेवून तरुण खेळाडू घडविण्यासाठी पुढाकार घेतलाय. पॅसिफिक स्पोर्टस् क्लबने एम. एस. धोनी क्रिकेट अकादमीचे कार्य हे अन्य आखाती देशांसह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवलेय.