World Cup 2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये होणार MS Dhoni ची एन्ट्री? BCCI घेणार मोठा निर्णय
MS Dhoni : टीम इंडियासाठीही महेंद्रसिंग धोनी यशस्वी कर्णधार असल्याचं म्हटलं जातं. धोनीच्या ( MS Dhoni ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
MS Dhoni : क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधार म्हटलं की धोनीचं ( MS Dhoni ) नाव घेतलं जातं. नुकतंच धोनीच्या ( MS Dhoni ) टीमने पाचव्यांदा आयपीएल जिंकली असून तो यशस्वी कर्णधार असल्याचं त्याने सिद्ध केलं आहे. केवळ आयपीएल नाही तर टीम इंडियासाठीही महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni ) एक योग्य कर्णधार होता, असं म्हटलं जातं. त्यामुळे अशातच आता वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये बीसीसीआय ( BCCI ) धोनीची ( MS Dhoni ) एन्ट्री करण्याच्या विचारात आहे.
धोनीच्या ( MS Dhoni ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 2013 साली धोनी कर्णधार असताना टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर आजपर्यंत टीम इंडियाने ( Team India ) एकंही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही.
ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये रंगणार वनडे वर्ल्डकप
यंदाच्या वर्षीय आयीसीसी ( ICC ) वनडे वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) खेळवण्यात येणार आहे. ऑक्टोबर - नोव्हेंबर या महिन्यांमध्ये भारतात वर्ल्डकपचं आजोयन करण्यात येणार आहे. हा वर्ल्डकप जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न टीम इंडिया करणार असून बीसीसीआय ( BCCI ) टीम इंडियाचा मेंटॉर ( Team India mentor ) म्हणून पुन्हा धोनीची नियुक्ती करू शकते.
काही रिपोर्ट्सनुसार, कर्णधार एमएस धोनीचं ( MS Dhoni ) मेंटॉर म्हणून टीम इंडियामध्ये ( Team India ) कमबॅक होण्याची शक्यता आहे. दरम्यान बीसीसीआयने ( BCCI ) याबाबत अधिकृत विधान दिलेलं नाही. मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये टीम इंडियाने एकंही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळे अशावेळी बीसीसीआय धोनीवर मोठी जबाबदारी देऊ शकते. कदाचित यामुळे यंदाच्या वर्षी भारताकडे वर्ल्डकप देखील येऊ शकतो.
धोनी पुन्हा दिसणार मेंटॉरच्या भूमिकेत?
टीम इंडियाचा मेंटॉर धोनी ( MS Dhoni ) असणार, ही काही पहिली वेळ नाहीये. 2021 मध्ये टी-20 वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. त्यावेळी देखील बीसीसीआयने ( BCCI ) धोनीच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली होती. मात्र त्यावेळी टीम इंडियाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.