मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) यानं ज्याप्रमाणे मैदान गाजवलं, अगदी त्याचप्रमाणे तो खासगी आयुष्यातही आपल्या कृतींतून सर्वांची मनं जिंकत असतो. मग ते अगदी शेती करणं असो किंवा मग लेक झिवासोबत वेळ घालवणं असो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक उत्तम खेळाडू असण्यासोबतच माही एक उत्तम 'Family man'ही आहे. माहिच्या घराबाबत सांगावं तर, रांचीमध्ये त्याला आलिशान बंगला आहे. सेंद्रीय शेतीपासून इतर बरेच प्रयोग तो इथं करत असतो.


आपल्या या घराबाहेर त्याच्या बऱ्याच महागड्या कार आणि बाईकचं कलेक्शनही आहे. इथं तो लेक आणि पत्नीसोबत बराच वेळ घालवताना दिसतो. अशा या कुटुंबवत्स माहिच्या घरी एक नवी पाहुणीसुद्धा आली आहे. (MS Dhoni family welcomes news goats wife sakshi shares video)


महेंद्र सिंह धोनी हा प्राणीप्रेमी आहे. त्याला श्वान, घोडे, ससे प्रचंड आवडतात. त्यातच आता म्हणे त्याच्या घरी आणखी एका नव्या प्राण्याचा प्रवेश झाला आहे. हा प्राणी म्हणजे बकरी. 


सूत्रांच्या माहितीनुसार साधारण वर्षभरापूर्वीच त्यानं बकऱ्यांना गुजरातमधून आणलं होतं. पण, त्या त्याच्या या घरी कधीच आणल्या नव्हत्या. आता मात्र त्या मोठ्या झाल्यामुळं त्यांना माहिच्या फार्महाऊसवर आणलं गेलं आहे. 



धोनीच्या पत्नीनं म्हणजेच साक्षीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या बकऱ्यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक पांढरीशुभ्र बकरी तिच्या कॅमेराच्या दिशेनं येताना दिसते. 


माहिच्या घरी आलेली ही नवी पाहुणी पाहून चाहत्यांना तर आनंद झालाच. तुम्हाला कशी वाटली ही पाहुणी?