नवी दिल्ली : श्रीलंके विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात अकिला धनंजयला स्टंप आऊट करत महेंद्र सिंह धोनीने इतिहास रचला. धोनीने श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये स्टंपिंगचं शतक पूर्ण केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने युजवेंद्र चहलच्या बॉलवर अकिला धनंजयला स्टंप आऊट करत हा इतिहास रचला आहे. ३६ वर्षीय धोनी रविवारी वनडे सामन्यांमध्ये १०० स्टंप आऊट करणारा विश्वातील पहिला विकेटकीपर बनला आहे. 


धोनीने आपल्या करिअरच्या ३०१व्या वनडेमध्ये या रेकॉर्डला गवसणी घातली. तसा तर टीम इंडियाचा विकेटकीपर धोनी हा विकेटकीपिंगसाठी जगभरात ओळखला जातो. त्याच्या विकेटकीपिंगचे अनेक चाहतेही आहेत. मात्र, काही खेळाडू असेही आहेत, जे धोनीच्या स्टंपिंगचा बळी ठरल्यानंतर आजपर्यंत हैराण आहे. 
 
धोनी हा जगातला एकुलता एक असा विकेटकीपर आहे, ज्याने वनडे सामन्यांमध्ये १०० स्टंपिंग्स केले आहेत. पण धोनीच्या स्टंपिंगचा बळी झालेला पहिला खेळाडू आजही हैराण आहे. बांगलादेशचा बॅट्समन राजिन सालेह धोनीच्या पहिल्या स्टंपिंगचा बळी होता. त्याला २००४ सचिन तेंडुलकरच्या बॉलवर धोनीने स्टंप आऊट केलं होतं. या गोष्टीला आता १३ वर्ष झाली आहेत. पण राजिन सालेह आजही या प्रश्नात आहे की, धोनीने त्याला कसं आऊट केलं?



सालेहने नफीस इकबालसोबत बांगलादेशच्या इनिंगला सुरूवात केली होती आणि त्याने ८२ रन्स केले होते. दरम्यान सचिनचा एक बॉल खेळण्याच्या नादात तो क्रिजच्या बाहेर गेला. स्टंपच्या मागे उभ्या असलेल्या धोनीने क्षणाचाही वेळ न घालवता बेल्स उडवल्या. सर्वांना वाटले की, सालेह बोल्ड झाला. पण तो बोल्ड नव्हता तर स्टंपिंगने आऊट झाला होता.