कॅप्टन कूलच्या घरी आला नवा पाहुणा...मुलगी झिवासोबत फोटो व्हायरल
महेंद्रसिंह धोनीने आपल्या मुलीला एक खास गिफ्ट दिलं आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पिंपरी चिंचवड घराची चर्चा सोशल मीडियावर होत असताना आता आणखी एक आनंदाची बातमी येत आहे. कॅप्टन कूलच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. माहीच्या मुलीसोबत त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहीची मुलगी झिवाच्या इन्टावर हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या रांची इथल्या फार्म हाऊसवर चेतकसोबत आता आणखी एक नवा पाहुणा आला आहे. दिसायला रंगाने पांढरा शुभ्र आणि डौलदार असलेला हा घोडा धोनीने खास आपल्या मुलीला भेट म्हणून दिला आहे. हा घोडा खास स्कॉटलंडवरून मागवण्यात आला होता. त्याचं वय 2 वर्ष आणि उंची साधारण 3 फूट आहे. हा घोडा आपल्या वेगासाठी नाही तर सौंदर्यासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे.
IPL 2021 चे सामने कोरोनामुळे 4 मे रोजी स्थगित झाल्यानंतर धोनी आपल्या कुटुंबासोबत रांचीमध्ये वेळ घालवत आहे. त्याची पत्नी साक्षी धोनी आणि त्याचे प्राण्यांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.नुकताच चेतक घोड्याच्या अंगावरून हात फिरवतानाचा धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IPL 2021चे उर्वरित 31 सामने UAEमध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान हे सामने होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व खेळाडू आता IPLच्या उर्वरित सामन्यांच्या तयारीला हळूहळू सुरुवात करतील.