मुंबई: कॅप्टन कूल धोनी मुलींचाच नाही तर सर्व खेळाडूंचा लाडका आहे. त्याचे फॅन तर भारतातच नाही तर जगभरात आहेत. अनेक खेळाडू कॅप्टन कूलला आपला गुरू देखील मानतात. या कॅप्टन कूलनं बॉलर आणि ऑलराऊंडर असलेल्या खेळाडूला कानमंत्र दिला आणि त्यांच्या करियरमध्ये मोठा बदल देखील घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न आहे. माहीच्या सल्ल्यामुळे खेळाडूंनी जगात बरेच नाव कमावले. दरम्यान, आता आणखी एका खेळाडूने धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा गोलंदाज राशीद खाननं केली आहे. आयपीएलदरम्यान सामना संपल्यानंतर धोनीने राशीद खानसोबत चर्चा केली होती. त्यावेळी त्याला खास सल्ला देखील दिला होता.


धोनीने मला सांगितले की, 'फील्डिंग करताना तू थोडी काळजी घे. तू डाइव्ह मारतोस. जेव्हा गरज नसते तेव्हा अशा पद्धतीनं गोलंदाजी करू नका. एकच राशीद खान आहे आणि लोक त्याला खेळताना पाहू इच्छीतात. त्यामुळे खेळताना दुखापत झाली तर काय होईल? मी जडेजाला देखील अशाच पद्धतीनं हेच समजवलं होतं.' धोनीनं दिलेला सल्ला फार मोलाचा ठरल्याचंही राशीद खाननं सांगितलं आहे. 


टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कॅप्टन कूल धोनी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याच्या नेतृत्वात दोन वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाने मिळवली आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वामध्ये तीन वेळा चेन्नई सुपरकिंग्स संघाला ट्रॉफी मिळाली आहे.