लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा 9 गडी राखत पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत रविवारी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली आणि बांगलादेशला 50 षटकांत 7 बाद 264 धावांवर रोखले. भारताकडून शिखर धवन (46), सामनावीर रोहित शर्मा (नाबाद 123) आणि विराट कोहली (नाबाद 96) 40.1 षटकांत एक विकेट देऊन सामना जिंकला.


बांगलादेश विरुद्ध भारतीय संघातील गोलंदाजी नंतर फलंदाजांनीही फॉर्म दाखवला. पहिल्या डावात बांगलादेशने फलंदाजी करत एक वेळ अशी आली होती की, भारतीय संघाच्या अडचणी वाढत गेल्या.
 
या सामन्यात बांगलादेशवर बहुतेक वेळ भारताने दबाव टाकला होता. केवळ एकदाच बांगलादेशाने भारतावर थोडासा दबाव टाकला होता. अशा परिस्थितीत भारताला एक महत्त्वाचा विकेट मिळविण्याची गरज होती. त्या वेळी केदार जाधवने बांगलादेशचा 28 व्या षटकांत तमीम इकबालची महत्त्वाची विकेट घेऊन भारतीय संघाला महत्त्वपूर्ण यश मिळावून दिले. या दरम्यान धोनीने हाताने हॅलिकॉप्टरची अक्शन केली.