धोनीच्या हातात श्रीभगवद्गीता अन् चेहऱ्यावर स्माइल! मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा फोटो व्हायरल
Dhoni Bhagavad Gita Photo: धोनी इंडियन प्रमिअर लीगचं 2023 चं पर्व जिंकल्यानंतर थेट मुंबईमध्ये दाखल झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचे पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. धोनीचा हा फोटो मुंबईत काढण्यात आला असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.
Dhoni Bhagavad Gita: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सला (CSK) 5 व्यांदा इंडियन प्रमिअर लिगचा (IPL 2023) चषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल (Viral Photo) झाला आहे. या फोटोत धोनी कारमध्ये बसल्याचं दिसत असून तो ड्रायव्हरच्या बाजूला बसला आहे. धोनी खिडकीतून बाहेर बघताना हातातील श्रीभगवद्गीता (Bhagavad Gita) दाखवताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. हातात श्रीभगवद्गीता पकडलेल्या धोनीच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.
धोनीचा तो फोटो चर्चेत...
धोनीचा हा व्हायरल फोटो मुंबईतील असल्याचा सांगितलं जात आहे. सोमवारी रात्री इंडियन प्रमिअर लिगचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. या सामन्यानंतर धोनी लगेच मुंबईला रावाना झाला. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी धोनी मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयामध्ये आला होता. याचवेळी हा फोटो काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हा फोटो अनेकांनी शेअर केला असून धोनीच्या हातात श्रीभगवद्गीता असल्याने काहींनी यामधूनच त्याला नेतृत्व करण्याची प्रेरणा मिळाल्याचं म्हटलं आहे. पाहुयात चाहत्यांचे ट्वीट्स...
1) धोनी आयपीएल जिंकल्यानंतर...
2) शांतीचा संदेश
3) तो काय वाचतोय पाहा...
4) अशीही तुलना...
5) मुलांनाही शिकवा...
धोनीवर शस्त्रक्रीया
धोनी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होण्यासाठी जात असतानाच हा फोटो काढण्यात आल्याचं सांगितलं जातं. धोनीने मंगळवारी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर लगेच तो शस्त्रक्रीयेसाठी रुग्णालयात दाखल जाला. गुरुवारी धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. धोनीवर शस्त्रक्रीया कोकिलाबेन रुग्णालयातील स्पोर्ट्स विभागाचे निर्देशक डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी केली. पादरीवाला यांनीच डिसेंबरमध्ये जखमी झालेला भारतीय विकेटकीपर ऋषभ पंतवर उपचार केले होते. पादरीवाला हे क्रिडा क्षेत्राशीसंबंधित व्यक्तींच्या हाडांच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 31 मार्च रोजी गुजरात टायन्सविरुद्धच्या आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यातच धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये दीपक चाहरने टाकलेला चेंडू आडवण्यासाठी धोनीने डाइव्ह मारली त्यावेळेस त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीसहीतच तो संपूर्ण सिझन खेळला. धोनी अनेक सामन्यांमध्ये गुडघ्याला बॅण्डएड बांधून खेळताना किंवा लंगडताना पाहायला मिळाला. मात्र अंतिम सामना जिंकल्यानंतर धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या संघ व्यवस्थापनाला मुंबईला रवाना होत असल्याचं कळवलं होतं. चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने धोनीच्या कुटुंबियांसोबत डॉ. मधू थोथापील यांच्या नेतृत्वाखालील एक टीम मुंबईला पाठवल्याची माहितीही समोर आली आहे.
पुढील पर्वामध्ये धोनी खेळणार
धोनी पुढील पर्वामध्ये खेळणार असल्याचे संकेत त्याने आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर दिले. मात्र आपलं शरीर साथ देणार असेल तरच आपण खेळू असंही धोनीने म्हटलं आहे. चेन्नईच्या संघाने आयपीएलचा चषक पाचव्यांदा जिंकल्यानंतर मोठं सेलिब्रेशन केलं नाही. सीएसकेचे सीईओ विश्वनाथ यांनी संघाचे मालक एन. श्रीनावासन हे या विजयामुळे फार समाधानी आहेत असं सांगितलं आहे.