कोलंबो :  श्रीलंकेविरूद्ध एकमेव टी-२० मध्ये भारताने सात गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीचा धमाका आपण पाहिला असेल पण या सामन्यात विकेटकीपर महेंद्रसिंग दोनी याच्या स्टंपिंगची जादू पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी झालेल्या सामन्यात धोनीची पुन्हा चपळता पाहायला मिळाली. मॅचमध्ये एका जादुई स्टंपिंगचे दर्शन त्याने घडवून चाहत्यांना खूश केले.


त्याने दाखविलेल्या चपळाईने श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजलो मॅथ्यूज बाद झाला. 


 




यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूजला धोनीने इतक्या झटपट बाद केले, की सर्वजण पाहतच राहिले. मॅचच्या ७ व्या ओव्हरमध्ये मॅथ्यूजने चहलच्या लेगस्पीनने चकमा खाल्ला. या दरम्यान त्याचा पाय क्रिजच्या अत्यंत थोडा बाहेर गेला. धोनीला हीच संधी हवी होती.  विजेच्या चपळाईने त्याने स्टंप उडविले. त्यानंतर थर्ड अंपायरने मॅथ्यूजला बाद ठरवले. मॅथ्यूजने केवळ ७ धावा केल्या.