नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वन-डे आणि टी-२० क्रिकेट मॅचेसची सीरिज संपली आहे. दोन्ही सीरिजमध्ये टीम इंडियाने २-१ने जिंकल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसरी आणि शेवटची टी-२० मॅच तिरुअनंतपुरममध्ये खेळण्यात आली. ही मॅच खूपच रोमांचक झाली. पावसामुळे ही मॅच ८-८ ओव्हर्सची खेळवण्यात आली. पण, शेवटी टीम इंडियाने ही मॅच ६ रन्सने जिंकली.


पाऊस पडत असल्याने मॅच होणार नसल्याची शक्यता अधिक होती त्यामुळे प्रेक्षक नाराज होते. मात्र, पाऊस थांबल्याने ही मॅच खेळण्यात आली. पाऊस सुरु असताना टीम इंडियाच्या प्लेअर्सने मैदानात फुटबॉल मॅच खेळत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी याने न्यूझीलंडच्या क्रिकेटर्ससोबत एक वेगळाच खेळ खेळला.


महेंद्रसिंग धोनी आणि न्यूझीलंडचे क्रिकेटर्स यांच्यात झालेल्या खेळाचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.


तिरुअनंतपुरममध्ये पाऊस पडत असल्याने मॅच खेळण्यास उशीर होत होता. या दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने आऊटडोर गेम फुटबॉलला इनडोर गेम करत न्यूझीलंडच्या क्रिकेटर्ससोबत खेळला.


महेंद्रसिंग धोनीने न्यूझीलंडच्या क्रिकेटर्ससोबत एका बंद रुममध्ये फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. विरोधी टीमच्या प्लेअर्ससोबत मैदानात आणि मैदानाबाहेर कसं वागावं हे धोनीला चांगलचं माहिती आहे.



न्यूझीलंडचा ओपनर बॅट्समन मार्टिन गप्टिल याने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला क्रीडाप्रेमींची चांगली पसंती मिळत आहे. मार्टिन गप्टिल, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे आणि टॉम ब्रूससोबत वॉलीबॉल फुटबॉलची मजा लुटली.