MS Dhoni जिंकून देणार टीम इंडियाला World Cup? महत्त्वाची अपडेट समोर!
ICC World Cup 2023: आगामी वर्ल्ड कपआधी भारतीय चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) टीम इंडियाचा मेंटॉर (Team India mentor) म्हणून पुन्हा धोनीची (Mahendra Singh Dhoni) नियुक्ती करण्याची शक्यता आहे.
Mahendra Singh Dhoni, Indian Cricket Team: यंदाच्या वर्षी आयसीसीकडून आयोजित केला जाणारा क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच वनडे वर्ल्डकप (ICC Cricket World Cup 2023) भारतात खेळवण्यात येणार आहे. यजमानपद भारताकडे असल्याने टीम इंडिया पुन्हा घरच्या मैदानावर वर्ल्ड कर मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये वर्ल्डकपचं आजोयन करण्यात आल्याने आता भारत घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. अशातच आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणार, अशी चर्चा होताना दिसत आहे.
MS Dhoni जिंकून देणार वर्ल्ड कप?
आगामी वर्ल्ड कपआधी भारतीय चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) टीम इंडियाचा मेंटॉर (Team India mentor) म्हणून पुन्हा धोनीची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. 2011 पासून टीम इंडियाने एकही आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही. अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली, भारताने वानखेडेवर एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला होती. त्यानंतर भारतात आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ पडलाय.
धोनी मेंटॉर होणार?
यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने, अशा परिस्थितीत बीसीसीआयला धोनीच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे तो आगामी वेळात टीमसोबत जोडला जाऊ शकतो. धोनीला यापूर्वी 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्यात आलं होतं. मात्र, जॉस बटलरच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाचं स्वप्न धुळीस मिळालं होतं. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता तो टीम इंडियाला महत्त्वाचे सल्ले देऊ शकतो.
आणखी वाचा - टेस्ट क्रिकेटला मिळाला नवा बादशाह, लॅब्युशेनची घसरगुंडी; ऋषभ पंतचा जलवा कायम!
टीम इंडियाचा कॅप्टन बदलणार?
मागील टेस्ट चॅम्पियनशीप असो वा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप... रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे रोहित शर्माने राजीनामा द्यावा, अशी मागणी सोशल मीडियावर होताना दिसते. त्यामुळे आता रोहितच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बीसीसीआय कोणता निर्णय घेणार यावर यावर सर्वांचं लक्ष आहे.