धोनीसंदर्भात रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी हा आगामी २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यासंदर्भात रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी हा आगामी २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यासंदर्भात रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, महेंद्र सिंग धोनी या स्टार क्रिकेटरने अद्याप आपलं संपूर्ण क्रिकेट खेळलेलं नाहीये. तो येणारा २०१९ सालचा वर्ल्डकपही नक्कीच खेळेल.
महेंद्र सिंग धोनीने श्रीलंकेविरोधात झालेल्या वन-डे सिरीजमध्ये धमाकेदार प्रदर्शन दाखवत चांगला स्कोर केला. श्रीलंकेसोबत झालेल्या मॅचेसमध्ये धोनीने ४५, ६७ आणि ४९ अशा तीन इनिंग खेळल्या आणि नॉट आऊट राहीला.
रवी शास्त्री यांनी पूढं म्हटलं की, भारतीय टीम मॅनेजमेंट एक्सपेरिमेंट आणि रोटेशन पॉलिसीचा वापर करत आहे. या योजनांमध्ये धोनी एकदम फिट बसत आहे. धोनीचा भारतीय संघावर प्रभाव आहे.
धोनी हा देशातील सर्वोत्तम विकेटकीपर आहे. त्याच्या बॅटींगचं प्रदर्शन आपण वगळलं तरीही तो विकेटकीपर म्हणून जबरदस्त प्रदर्शन करतो असेही रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.