मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. आज धोनी 41 वर्षांचा झाला आहे. धोनीचा वाढदिवस केवळ तो आणि त्याचे कुटुंबीयच साजरा करत नाहीत, तर त्याचे करोडो चाहतेही त्यांच्या खास शैलीत साजरा करतात. धोनी त्याच्या वाढदिवसानिमित्त परदेशात आहे आणि तिथेही तो त्याच्या आवडीला मुरड घालत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान यष्टिरक्षक-फलंदाजांपैकी एक असलेला धोनी यावेळी त्याच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटनमध्ये आहे. याठिकाणी तो कार ड्रायव्हिंगपासून ते विम्बल्डन चॅम्पियनशिपपर्यंत गोष्टी एन्जॉय करतोय. यामध्ये त्याची पत्नी साक्षी धोनी त्याला साथ देतेय. 


एमएस स्वत: सोशल मीडियाद्वारे कोणतेही अपडेट देत नाही, परंतु साक्षी तिची आणि माहीच्या चाहत्यांची खूप काळजी घेते आणि त्यांच्या अॅक्टिव्हिटी चाहत्यांपर्यंत पोहोचवते.


लंडनच्या रस्त्यावर फेरारी की सवारी


बुधवारीही साक्षीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक अपडेट पोस्ट केलीये. साक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर दोन व्हिडिओ पोस्ट केले, ज्यामध्ये ती एमएस धोनीसोबत सुपरफास्ट कारमध्ये लंडनच्या रस्त्यावर आनंद घेत होती. आता ती कोणती कार होती हे साक्षीने सांगितले नाही, पण ऑटोमोबाईलप्रेमींनी ती ओळखण्यास उशीर केला नाही. ही जगातील सर्वात प्रसिद्ध स्पोर्ट्स कार फेरारीची SF90 Stradle आहे.


SF90 Stradle गती, इंजिन आणि किंमत


SF90 ही 3990 cc पेट्रोल इंजिन असलेली सुपरफास्ट स्पोर्ट्स कार आहे, ज्यामध्ये 8 सिलेंडर आहेत. ही कार केवळ 2.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. फेरारी SF90 Stradle चा टॉप स्पीड 340 kmph आहे. 


दरम्यान भारतात तिची किंमत सुमारे 7.50 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी सर्व प्रकारचे कर इत्यादी खरेदी केल्यानंतर 8.50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.