MS Dhoni : सचिननंतर आता धोनीलाही मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी अयोध्येला जाणार?
Ayodhya Ram Mandir Invitation : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण मिळालं आहे.
MS Dhoni receives Ram Temple invitation : अयोध्येच्या राम मंदिरात प्रतिष्ठापणा होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. संपूर्ण देश या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याला राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण (Ayodhya Ram Mandir Invitation) मिळालं आहे. त्यामुळे आता धोनी राम मंदिराचं आमंत्रण स्विकारणार का? असा सवाल विचारला जात आहे.
येत्या 22 जानेवारीला देशात होणाऱ्या सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सामील होणाऱ्या मान्यवरांमध्ये आता सचिन तेंडुलकरनंतर आता महेंद्रसिंग धोनीचंही नाव सामिल झालंय. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. अशातच आता सचिनसह धोनी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या राम मंदिर प्रतिष्ठापणेच्या विषेश कार्यक्रमासाठी सुमारे 8000 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. रामललाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यात विशेष व्यक्ती सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख (आरएसएस) मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यानंतर आता महेंद्रसिंग धोनीला देखील निमंत्रित करण्यात आलं आहे.
दरम्यान, उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा निमंत्रणामध्ये समावेश आहे. मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता अयोध्येत मोठ्या संख्येने तयारी सुरू असल्याचं पहायला मिळतंय.
महाराष्ट्रातून निमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांची यादी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)
रिपाई खासदार रामदास आठवले (Ramdas Athwale)
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)