MS Dhoni : भारतात आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृ्त्वाखाली टीम इंडिया (Team India) दमदार कामगिरी करत असून आतापर्यंत पाच सामने जिंकले आहेत. टीम इंडियाचं सेमीफायनलचं स्थान जवळपास निश्चित झाालंय. भारतात विश्वचषकाची धुम सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने (MS Dhoni) एक मोठा खुलासा केला आहे. भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एम एस धोनी याचं स्थान सर्वात वरती आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2011 साली एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्याआधी 2007 मध्ये धोनीच्याच नेतृ्त्वाखाली टीम इंडियाने टी20 विश्वचषकाला गवसणी घातली. तर 2013 मध्ये टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने ही शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने केला मोठा खुलासा
कारकिर्दीच्या सर्वोत्तम स्थानी असताना एम एस धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इंडियन प्रीमिअर लीग सुरु होण्यापूर्वीच म्हणजे 15 ऑगस्टला धोनीने निवृत्तीची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता इतक्या वर्षांनी धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.  आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेण्याचा निर्णय एक वर्ष आधीच मनाशी पक्का केला होता असं वक्तव्य एमएस धोनीने केलं आहे. आता आपलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपलं आहे याची जाणीव आपल्याला झाली होती, पण औपचारिक घोषणा करण्यासाठी एक वर्ष लागंल असा खुलासा धोनीने केला आहे. 


या दिवशी घेतला निवृत्तीचा निर्णय
धोनी 2019 ला मॅंचस्टरमध्ये न्यझीलंडविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. 2019 चा सेमीफायनलचा तो सामना होता. या सामन्यात धोनी रनआऊटझाला आणि याबरोबरच टीम इंडियाचं आव्हानही संपुष्टात आलं. त्याचवेळी आपण शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलोय याचं भान आलं, पण निर्णय घ्यायला एक वर्ष लावला असं धोनीने आपल्या मुलाखतीत सांगितलं. निवृत्ती निर्णय घेणं खूप वेदनादायी असतं कारण त्यावेळी तुम्हाला कळतं की आता आपण देशासाठी पुन्हा खेळू शकणार नाही. क्रिकेटच नाही इतर कोणत्याही खेळातल्या खेळाडूसाठी आयुष्यातला हा सर्वात मोठा निर्णय असतो असंही धोनीने म्हटलंय. 


आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी 
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केवळ आयपीएलमध्ये खेळण्याचं ठरवलं, निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा कोविडचा काळ होता, त्यावेळची आयपीएल स्पर्धा दुबईत खेळवण्यात आली होती. त्यावेळी धोनी आयपीएलमधूनही बाहेर पडणार असं सर्वांच वाटत होतं, धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करतो. धोनीच्या नेतृ्त्वाखाली चेन्नईने दोन वेळा आयपीएचं जेतेपद पटकावलं आहे.