मैदानात सहज हेलिकॉप्टर शॉट खेळणाऱ्या धोनीने, जीवलग मित्राला वाचवण्यासाठी थेट खरखुरं हेलिकॉप्टर पाठवलं पण...
जीवन मृत्यूच्या संघर्षात अडकलेल्या जीवलग मित्राला वाचवण्यासाठी धोनीने हेलिकॉप्टर पाठवलं पण...
मुंबई: महेंद्र सिॆंह धोनी आपल्या फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. धोनीच्या करियर बद्दलतर सर्वांनाच माहिती आहे. मैदानात सहज हेलिकॉप्टर शॉट खेळणाऱ्या धोनीने, जीवलग मित्राला वाचवण्यासाठी थेट खरखुरं हेलिकॉप्टर पाठवलं पण दुर्दैवानं त्या मित्रानं मात्र हेलिकॉप्टर पोहोचण्याआधीच त्याची साथ सोडली.
धोनीचा बालपणीचा जीवलग मित्र संतोष लाल याने धोनीला हेलिकॉप्टर शॉर्ट्स खेळायला शिकवले. धोनी आणि संतोष लहानपणापासूनच एकत्र क्रिकेट खेळत असायचे. दोघेही टेनिस बॉलचा उपयोग क्रिकेट खेळण्यासाठी वापरत असत आणि राज्यभर फिरत असत.
संतोषची फलंदाजी पाहणे धोनीला खूप आवडचं. संतोष निर्भय फलंदाज होता, त्यानेच धोनीला हेलिकॉप्टर शॉट खेळायला शिकवलं. संतोषकडून हेलिकॉप्टर शॉट्स शिकण्यासाठी धोनी त्याला गरम समोसे खायला द्यायचा अशीही चर्चा होती. धोनी आणि संतोष रांचीमध्ये एकत्र खेळायचे.
संतोषला एक आजार झाला त्यामुळे त्याच्या अंगाला संपूर्ण सूज यायची. तो टीम इंडियाकडून खेळण्यासाठी दौऱ्याला जाण्याआधी आजारी पडला. त्याची प्रकृती खूप नाजूक होती. त्याचा जीव वाचवण्यासाठी धोनीनेही धडपड सुरू केली. चांगल्या उपचारासाठी त्याला रांचीमध्ये येता यावं म्हणून हेलिकॉप्टर पाठवलं. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचण्यास विलंब झाला आणि संतोषने जगाचा निरोप घेतला. अवघ्या 32 व्या वर्षी उत्तम खेळणारा खेळाडू आणि धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणारा जीवलग मित्र गेल्यानं धोनीच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती.