मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर आधारीत 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात सुशांत सिंग राजपूतनं महत्वाची भूमिका साकारली होती. रविवारी सुशांत सिंग राजपूतनं वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येवर बॉलिवूडबरोबर क्रिकेट जगतातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली. यामध्ये धोनीचा देखील समावेश आहे. याबाबत माहिती धोनीच्या मॅनेजर अरूण पांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाकरता सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती. धोनीसोबत राहून सुशांतने त्याची स्टाईल आत्मसात केली आहे. या दोघांनी एकत्र सोबत घालवलेला काळ धोनीला आता आठवत आहे. धोनी आणि त्याच्या पत्नीने कोणतीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली नाही. पण त्यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे. 



सुशांत केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या जाण्याचा शोक कसा व्यक्त करावा हेच कळत नाही. त्याचं भविष्य आहे याची मला खात्री होती. पण त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने धोनी खूपच खिन्न धाला.



सुशांत सिंगचं जाणं सगळ्यांनाच धक्का लावून जाणार आहे. धोनीची भूमिका खूप उत्तम प्रकारे सुशांतने साकारली होती. या सिनेमाने सुशांतला एका वेगळ्याच उंचीवर नेलं होतं.