Mumbai Indians vs Chennai Super Kings : वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात (MI vs CSK IPL 2024) रंगतदार लढत पहायला मिळाली. फिनिशर म्हणून धोनीने (MS Dhoni) या सामन्यात पुन्हा राडा केला. अखेरच्या ओव्हरमध्ये मैदानात येऊन धोनीने तब्बल 500 च्या स्टाईक रेटने धावा कुटल्या. 42 वर्षाचा धोनी चेन्नईच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मैदानात आला अन् 4 बॉलमध्ये 20 धावा करून गेला. त्यामुळे वानखेडे स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. एमएस धोनीच्या झंझावती 20 धावांच्या बळावर चेन्नईने 206 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, धोनीसमोर हार्दिक पांड्याच्या (hardik pandya) बॉलिंगचा पार कचरा झाल्याचं दिसून आलं. धोनीने कसं मैदान मारलं सविस्तर पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, चेन्नईने दमदार सुरूवात केली नाही. अजिंक्य रहाणे सलामीला आला खरा पण त्याला चांगली खेळी करता आली नाही. कॅप्टन ऋतुराज गायकवाडने 40 बॉलमध्ये 69 धावा केल्या. तर शिवम दुबेने 38 बॉलमध्ये 10 फोर अन् 2 सिक्स मारत 66 धावांची धुंवाधार खेळी केली. मिशल बाद झाल्यावर मैदानात धोनी मैदानात येणार का? असा सवाल विचारला जात होता. धोनी 20 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मैदानावर आला, त्यावेळी चेन्नईची धावसंख्या 186 इतकी होती. धोनीकडे फक्त 4 बॉल खेळण्यासाठी होते. समोर होता हार्दिक पांड्या...!


चेन्नईच्या धोनीने सलग तीन षटकार मारत हार्दिक पांड्याची गोलंदाजी फोडून काढली. पहिल्याच बॉलवर लॉग ऑफवर खणखणीत सिक्स मारला अन् पुढच्या बॉलवर आडवा पट्टा फिरवला अन् सिक्स मारला. त्यानंतर सिक्स मारत धोनीने चेन्नईला 200 च्या पार केलं. त्यामुळे चेन्नईला मुंबईवर पकड मजबूत करता आली.


पाहा Video



मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.


चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.