Rishabh Pant sister engagement ceremony : टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. आयपीएल ऑक्शनवेळी ऋषभच्या उपस्थितीने चाहत्यांमध्ये पुन्हा जोश निर्माण झाला आहे. अशातच आता ऋषभ पंतची बहिण साक्षी पंतच्या (Rishabh Pant Sister) साखरपुड्याचे काही फोटो आता समोर आले आहेत. ऋषभ पंतने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लाडक्या बहिणीच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या सोहळ्यात कुटूंबातील व्यक्तींसह काही दिग्गजांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमात जोडप्यांना शुभेच्छा देण्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने देखील उपस्थिती दर्शविली होती. त्याचा एक व्हिडीओ (MS Dhoni Speech Video) आता समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साक्षीने (Sakshi Pant) तिचा भावी पती अंकित चौधरीसोबत (Ankit chaudhary) साखरपुड्यातील काही फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी तिने एंगेजमेंट रिंग देखील दाखवली. अंकित चौधरीसह साक्षी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच या कपलला शुभेच्छा देण्यासाठी धोनीने साखरपुड्याला (Rishabh Pant sister engagement) हजेरी लावली होती. त्यावेळी धोनीने एक भन्नाट भाषण देखील केलं. त्यावेळी धोनीने दोघांना हटके  शुभेच्छा देखील दिल्या. नेमकं काय म्हणाला धोनी? पाहुया...


साक्षी पंत आणि अंकित चौधरी यांना एंगेजमेंटच्या खुप खुप शुभेच्छा...आजच्या या क्षणी दोघंही खुप आनंदी दिसत आहेत. त्याचबरोबर उत्साही देखील आहेत. त्यांनी केलेला डान्स मला आवडला. त्यांची जोडी चांगली जमल्याचं दिसतंय. मी त्यांना पुढील आव्हानांसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो, असं धोनी म्हणताच... उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर धोनीने सावरासावर केली. मी करियरच्या दृष्टीकोनातून सांगतोय, असं धोनी म्हणताना दिसतोय. धोनीच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या तुफान ट्रेंड होत असल्याचं पहायला मिळतंय.


पाहा Video



अंकित चौधरी आहे तरी कोण?


अंकित चौधरी आणि साक्षी पंत जवळपास 9 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अंकित चौधरी इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. एलिट आयटीयू नावाच्या कंपनीच्या संचालक मंडळावर अंकित काम करतो. 2021 मध्ये त्याची संचालक मंडळावर नियुक्ती झाली. बरीच वर्ष डेट केल्यानंतर साक्षी आणि अंकितने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी  लांब केसांचा लूक असलेल्या सूटमध्ये धोनीचा हुक्का ओढतानाचा एक व्हिडीओ (Mahendra Singh Dhoni Hookah Video) समोर आला होता. हा व्हिडीओ पार्टीतील असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, ऋषभच्या बहिणीच्या साखरपुड्यातील धोनीचा ड्रेस आणि हुक्का व्हिडीओमधील ड्रेस सेम असल्याने अनेकांच्या भूवया उंचवल्या आहेत. सोशल मीडियावर देखील याबाबत चर्चा होताना दिसत आहे.