श्रीनगर: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने काही दिवसांपूर्वीच आपण भारतीय लष्कराच्या सेवेत रुजू होणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी धोनीने बीसीसीआयकडून दोन महिन्यांची विश्रांती मागितली होती. मात्र, धोनी लष्करात नेमकी कोणत्या प्रकारची सेवा बजावणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर ही उत्सुकता संपली आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट कर्नल (मानद) महेंद्रसिंह धोनीची काश्मीरमध्ये तैनात असणाऱ्या १०६ टीए बटालियनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत धोनी या बटालियनमध्ये सेवेत असेल. याठिकाणी त्याला गस्त घालणे, सुरक्षारक्षक आणि लष्कराच्या चौकीवर टेहाळणीची जबाबदारी पार पाडावी लागेल. 


विराटच्या सांगण्यामुळे धोनीने निवृत्ती लांबवली?


व्हिक्टर फोर्सचा भाग म्हणून धोनीचे युनिट काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आले आहे.  अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि लष्कर मुख्यालयाकडून मिळालेल्या मान्यतेनंतर धोनी पेट्रोलिंग(गस्त) गार्ड आणि पोस्ट ड्युटी यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळेल आणि सैनिकांसोबतच राहील, असे लष्कराच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार?