नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंड विरूद्ध राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यानंतर धोनी टीकाकारांच्या निशान्यावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने या सामन्यात खूपच निराशाजनक खेळ केला होता. त्यानंतर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पण मुख्य कोच रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी धोनीचं समर्थन केलं. इतकी टीका होत असतानाही धोनी नेहमीप्रमाणे कूल आहे. 


सध्या तो रांचीमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. १६ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. पहिला टेस्ट सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. धोनीने टेस्टमधून सन्यास घेतला आहे त्यामुळे तो या सामन्यांमध्ये नसणार.


अशात धोनी टीकाकारांच्या आणि क्रिकेटच्या दूर कुटुंबासोबत मस्ती करत आहे. इतकेच नाही तर धोनी आता ट्रेनर बनला आहे. धोनी सध्या त्याच्या पाळलेल्या कुत्र्यांना ट्रेनिंग देत आहे. हे ट्रेनिंग देतानाचे व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 




कुत्र्यांसोबतचा व्हिडिओ शेअर करण्याची ही धोनीची पहिलीच वेळ नाहीये. याआधीही त्याने कुत्र्यांना ट्रेनिंग देतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.