नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्या होणाऱ्या पहिल्या वन-डे मॅचसाठी दोन्ही टीम्स धरमशाला येथे पोहोचल्या आहेत. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दोन्ही टीम्सने प्रॅक्टीस करण्यास सुरुवात केली आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


रोहित शर्माच्या हातात टीमची धूरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीम्समध्ये सामना रंगणार आहे. टीमची धुरा विराट कोहलीच्याऐवजी रोहित शर्माच्या हातात असणार असणार आहे. असं असतानाच सर्वांच्या नजरा आणखीन एका प्लेअरवर असणार आहेत आणि तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी.


मैदानात धोनीचं मत फार महत्वाचं


आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, टीमची धूरा कुणाकडेही असो पण मैदानात एमएस धोनी याचं मत फार महत्वाचं ठरतं. टीम इंडियाचे एक नाही तर दोन कॅप्टन असल्याचं अनेकांनी यापूर्वी म्हटलं आहे. एक म्हणजे विराट तर दुसरा म्हणजे धोनी. 


धोनीची जबाबदारी वाढणार


यावेळी विराट कोहली टीममध्ये नाहीये. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीवर जबाबदारी वाढणार आहे. तुम्ही आजपर्यंत धोनीला मैदानात सिक्सर लगावताना पाहीलं असेल मात्र, त्याला फास्ट बॉलिंग करताना फारच कमीवेळा पाहीलं असेल.


धोनी फास्ट बॉलिंग करतो आणि त्याचा नजारा धरमशाला येथे नेट प्रॅक्टीसमध्ये पहायला मिळाला. प्रॅक्टीस करत असताना धोनीने जबरदस्त बॉलिंग केली. जर संधी मिळाली तर आपण चांगली बॉलिंगही करु शकतो हे धोनीने दाखवून दिलं.



टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात ३ मॅचेसची वन-डे सीरिज होणार आहे. पहिली वन-डे मॅच धरमशाला येथे रविवारी होणार आहे. दुसरी वन-डे मोहालीत तर तिसरी वन-डे विशाखापट्टनम येथे होणार आहे. त्यानंतर टी-२० सीरिजही खेळली जाणार आहे.