नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सिंगापूरमध्ये नवी क्रिकेट अकादमी उघडणार आहे. ३६ वर्षीय धोनी २० जानेवारीला सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये या अकादमीचे उद्घाटन करणार आहे. परदेशात त्याची ही दुसरी अकादमी असेल. 


सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत बोलताना धोनी म्हणाला, कोणत्याच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. फिट राहण्याशिवाय तुम्हाला जीवनात नेतृत्व तसेच अन्य पैलू शिकायचे असतील तर खेळ हे चांगले माध्यम आहे. प्रत्येक मुलाला मैदानावरचे खेळ खेळलेच पाहिजेत. 


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये धोनीने पहिली ग्लोबल क्रिकेट अकादमी अल कोज दुबईमध्ये सुरु केली होतती. त्याने यासाठी पॅसिफिक स्पोर्ट्स क्लब आणि आरका स्पोर्ट्स क्लबसोबत भागीदारी केली होती.



सिंगापूर क्रिकेट अकादमीसाठी करीकुलम स्वत: धोनी डिझाईन करणार आहे. त्याच्यासोबत सिंगापूर राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार जीके दिव्या असणार आहे. ईस्ट कोस्ट रोडवरील सेंट पॅट्रिक स्कूलस्थित ही अकादमी सर्व वयोगटातील मुलांना अनुभवी प्रशिक्षकांसह प्रशिक्षण देणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरु झाली असून आतापर्यंत २०० मुलांनी आपली नावे नोंदवलीत.