नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आपल्या कुटुंबियांबरोबर सध्या तो वेळ घालवतोय.  धोनी सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसतो, पण त्याची पत्नी साक्षी नेहमीच धोनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत करत असते. तसंच त्याचे चाहतेही त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीचा नवा लूक
सध्या धोनी कुटुंबियांबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसतोय. धोनीच्या चाहत्यांनी त्याचा एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत धोनीचा नवीन लूक पाहायला मिळाला आहे. धोनीचा हा नवीन लूक आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या फोटोत धोनीने हिमाचल प्रदेशमध्ये प्रसिद्द असलेली 'कुल्लू टोपी' घातली आहे. तसंच धोनीनं मिशांना पिळ दिला असून हा नवा लूक त्याला चांगलाच शोभून दिसतोय. 
या फोटोमध्ये धोनी एकदम कुल वाटतोय. धोनीने गेल्या वर्षभरात अनेकदा आपला लूक बदलला आहे. त्यामुळे धोनीची ही नवी स्टाईल त्याचे फॅन्स लवकरच फॉलो करताना दिसतील.



धोनीचा अनोखा अंदाज
धोनीचे आतापर्यंत बरेच लूक क्रिकेट चाहत्यांनी पाहिले आहेत. क्रिकेटमध्ये जेव्हा धोनीने पदार्पण केलं तेव्हा त्याच्या लांब केसांनी सर्वांनाच मोहिनी घातली होती. त्यानंतर धोनीने आपले केस कापले आणि नवीन लूक चाहत्यांसमोर आणला होता. क्रिकेट कारकिर्दीत धोनीने बरेच लूक बदलले. धोनीने एकदा प्रसिद्ध फुटबॉलपटूच्या केसांचा लूक कॉपी केला होता. त्यावेळीही धोनीच्या या लूकची चर्चा चांगलीच झाली होती.



फार्म हाऊसवर घोड्याबरोबर शर्यत
हिमाचल प्रदेशला जाण्याआधी धोनीचा त्याच्या रांचीतल्या फार्महाऊसवरचा फोटो आणि व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत धोणी आपल्या घोड्याबरोबर शर्यत लावताना दिसला होता.