Mukesh Kumar ODI Debut In IND vs WI: सध्या भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये पहिला वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नव्या दमाच्या मुकेश कुमार याला संघात संधी देण्यात आली आहे. 29 वर्षाच्या मुकेश कुमार याला डेब्यु कॅप मिळाली आहे. त्यामुळे आता लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न अखेर सातत्यात उतरलं आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश कुमारचा भारतीय संघापर्यंत पोहचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. लहानपणी मुकेश कुमार याच्या क्रिकेट खेळण्याला त्याच्या वडिलांचा विरोध होता. पण मुकेश कुमार डगमगला नाही, त्याने आपला खेळ सुरू ठेवला आणि गोलंदाजीला धार लावली. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर मुकेश कुमार याला भारतीय संघात स्थान मिळालंय.




पाहा Playing XI


टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.


वेस्ट इंडिज टीम: शाई होप (कर्णधार), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाज, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोटी.


आणखी वाचा - Sreesanth: तोच यॉर्कर अन् तोच दरारा, पण रागात हात आपटणाऱ्या श्रीसंतने कडक स्माईल दिली; पाहा Video


दरम्यान,  नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने बॉलिंगचा निर्णय घेत विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याला पहिली विकेट मिळाली.