Mumbai News : सोशल मीडिया एन्फल्युएन्सर सपना गिल विनयभंग प्रकरणात सत्र न्यायालयाने क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अंधेरीतील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर शॉ आणि अन्य सहकाऱ्यांनी विनयभंग केल्याचा सपनाचा (Sapna Gill) आरोप आहे. पृथ्वीला झालेल्या मारहाणीप्रकरणी सपनाला अटक झाली होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटकाही झाली. सपनाने पृथ्वीसह त्याचा मित्र आशीष यादव आणि इतरांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार (Complaint of molestation) दाखल केली होती. तर शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्यावर बॅटने हल्ला केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्याने सपनाने महानगरदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. तक्रारीची दखल घेऊन दंडाधिकाऱ्यांनी 3 एप्रिल रोजी सांताक्रूझ पोलिसांना चौकशी करून 19 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु पोलिसांवर कारवाई करण्याची सपनाची मागणी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी मंगळवारी पृथ्वीसह विमानतळ पोलिसांनाही समन्स बजावले आहेत. गिलने आपल्या तक्रारीत भारतीय दंडाच्या कलम 354 (विनयभंग), 509 (शब्द, हावभाव किंवा हावभाव एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याच्या हेतूने) आणि 324 (स्वेच्छेने धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे) अंतर्गत एफआयआर नोंदविण्याची मागणी केली.


पृथ्वी शॉने आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अनेक चांगल्या खेळी खेळल्या असल्या तरी विशेषत: शेवटच्या 3 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून देखील वगळण्यात आलं होतं. पृथ्वी शॉ गेल्या 3 सामन्यात केवळ 34 धावा करू शकलाय. त्यामुळे दिल्लीने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पृथ्वी शॉ रिकी पॉटिंगसह हुज्जत घातलाना देखील दिसला होता. त्यामुळे त्याच्यावर टीका देखील झाली होती.


दरम्यान, पृथ्वी शॉने सपनाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, तर दुसरीकडे सपना गिलने क्रिकेटपटूवर विनयभंगाचे आरोप केले होते. त्यामुळे प्रकरण आणखी वाढणार असं चित्र स्पष्ट झालं होतं.