पुणे : अंबाती रायडूची पहिली आयपीएल सेंच्यूरी आणि शेन वॉटसनच्या हाफ सेंच्यूरीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादवर 8 विकेटने विजय मिळवला आहे. रायडूने 62 बॉलमध्ये शतक ठोकत शानदार खेळी केली. रायडूने रविवार पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने 179/4 रन केले होते. चेन्नईन 19 ओव्हरमध्ये 2 विकेट गमवत 180 रनचं लक्ष्य पूर्ण केलं. चेन्नईने या विजयासह 16 अंक मिळवले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने अंबाती रायडूकडून ओपनिंग करण्यास सुरुवात केली आणि त्याचं नशिबच बदललं. मागील अनेक सीजनमध्ये मुंबईकडून खेळणारा रायडू यंदा चेन्‍नईमधून खेळत आहे. रायडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या जोरावर चेन्नई टीमने अनेक सामने जिंकले आहेत.


सर्वाधिक रन 


अंबाती रायडूने आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये सर्वाधिक रन केले आहे. या दरम्याने त्याने एकून 329 रन केले आहेत. आतापर्यंत त्याने 2 अर्धशतक केले आहेत तर 1 शतक ठोकलं आहे. 


अंबाती रायडूने 5 सामन्यांमध्ये ओपनिंग केली आहे. त्याने यंदा चेन्नई संघात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागच्या सीजनमध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नव्हती. मुंबईकडून त्याला फक्त 5 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. 5 सामन्यांमध्ये त्याने फक्त 91 रन केले होते. त्यामुळे मुंबईने यंदा त्याला आपल्या टीममध्ये घेतलं नव्हतं. पण यंदाच्या सीजनमधला तो सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे.