MI vs DC : अखेर मुंबईच्या विजयाचा नारळ फुटला, शेफर्ड ठरला गेमचेंजर; दिल्लीवर `इतक्या` धावांनी विजय!
MI vs DC, IPL 2024 : रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला 29 धावांनी मात दिली.
Mumbai Indians beat Delhi Capitals : आयपीएलचा 20 वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्से दिल्लीचा पराभव करून आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. मुंबईने दिल्लीसमोर 235 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. मात्र, दिल्लीला केवळ 205 धावा करता आल्या. मुंबईकडून अखेरच्या ओव्हरमध्ये वादळी खेळी करणारा रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) गेमचेंजर ठरला. तर मुंबईकडून जेराल्ड कोएत्झीने 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 4 विकेट्स नावावर केल्या.
एनरिक नॉर्टजेच्या अखेरच्या ओव्हरमध्ये रोमॅरियो शेफर्डच्या तडाख्यात दिल्लीचा संघ सापडल्याने दिल्लीसमोर आव्हान मोठं होतं. 235 धावांचं आव्हान पार करताना दिल्लीची दैना उडाली. दिल्लीला पहिला धक्का 22 च्या स्कोअरवर बसला. डेव्हिड वॉर्नर आठ चेंडूत 10 धावा करून बाद झाला. आठ ओव्हरनंतर दिल्लीने एक विकेट गमावून 69 धावा केल्या. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या धावा आवळल्या. बुमराहने पृथ्वीला क्लीन बोल्ड केलं अन् मुंबईला सामन्यात परत आणलं. अभिषेक पोरेल बाद झाल्यावर ट्रिस्टन स्टब्सने दमदार अर्धशतक झळकावलं.
मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 234 धावा केल्या होत्या. मुंबईकडून रोहित शर्माने 49 धावांची वादळी खेळी केली. तर अखेरीस रोमारियो शेफर्डने 20 व्या षटकात 32 धावा दिल्या. ॲनरिक नॉर्टजेच्या अखेरच्या ओव्हरमध्ये त्याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. एका ओव्हरमधअये चेंडू स्टेडियमच्या छतावर पडला. शेफर्डने 10 चेंडूत 39 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर टीम डेव्हिडने 21 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. त्याचवेळी शेफर्डने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार ठोकले. दोघांनी 13 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. मुंबईने शेवटच्या पाच षटकांत एक गडी गमावून 96 धावा केल्या.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.