MI vs RCB : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईने त्यांच्या जुना बदला घेत 6 विकेट्सने बंगळूरूवर विजय मिळवला आहे. वानखेडेच्या मैदानावर आज सूर्यकुमार (Suryakumar Yadav) नावाचं वादळ आलं होतं. सूर्याच्या तुफान फटकेबाजीमुळे बंगळूरूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा 6 विकेट्सने पराभव करून यंदाच्या आयपीएलमध्ये सहाव्या विजयाची नोंद केलीये. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 199 रन्स केले होते. 200 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 16.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्याचा खरा हिरो ठरलाय तो म्हणजे सूर्यकुमार यादव.


वानखेडेवर मुंबईचा विजय


200 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला वानखेडेच्या होमग्राऊंडवर धूळ चारली. या विजयाचा खरा हिरो ठरलेल्या सूर्यकुमार यादवने उत्तम फलंदाजी करत हा सामना आरसीबीच्या खिशातून काढून घेतला.


आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या 7 रन्सवर बाद झाला. इशाने मोठे शॉट खेळत 42 रन्सची खेळी केली. या दोघांच्या विकेटनंतर. नेहल वढेरा आणि सूर्यकुमार या जोडीचं तुफान वानखेडेच्या मैदानावर पहायला मिळालं. आजच्या सामन्यात सूर्याने तुफानी फलंदाजी करत 34 बॉल्समध्ये 83 रन्स केले. त्याच्या या खेळीमुळे मुंबईला विजय मिळवणं शक्य झालं.


मॅक्सवेल आणि फाफची खेळी व्यर्थ


आजच्या सामन्यात विराट कोहली देखील फेल गेलेला ठरला. मात्र आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकं झळकावली. फाफने 41 बॉल्समध्ये 65 रन्सची खेळी खेळली. तर मॅक्सवेल 68 रन्स केले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीला 200 पार स्कोर नेण्यात यश आलं. मात्र आरसीबीचे गोलंदाज मात्र आज साजेशी कामगिरी करू शकले नाहीत.


दोन्ही टीम्सची प्लेईंग 11


मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहल वधेरा, क्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडोर्फ, पीयूष चावला, आकाश मधवाल, 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, हर्षल पटेल, विजयकुमार व्यशाक