Mumbai Indians : हार्दिक पांड्याच्या पलटणमध्ये मोठा बदल, `या` वर्ल्ड कप स्टार खेळाडूला केलं सामील!
IPL 2024, Mumbai Indians : मोहम्मदच्या जागी गुजरात टायटन्सने संदीप वारियरची निवड केल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त दिलशान मदुशंकासाठी मुंबई इंडियन्सने क्वेना मफाकाचा संघात समावेश केला आहे.
Kwena Maphaka replacement to Dilshan Madushanka : येत्या 22 मार्चला आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा नारळ फुटणार आहे. आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील मुंबई इंडियन्स 4 सामने खेळणार आहे. अशातच आता मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससाठी महत्त्वाची महिती समोर आली आहे. मोहम्मद शमीच्या जागी गुजरात टायटन्सने संदीप वारियरची निवड केल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त दिलशान मदुशंकासाठी मुंबई इंडियन्सने क्वेना मफाकाचा संघात समावेश केला आहे.
गुजरात टायटन्सने (GT) मोहम्मदच्या जागी संदीप वॉरियरची निवड केली आहे. शमीने तर मुंबई इंडियन्स (MI) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी दिलशान मदुशंकाच्या जागी क्वेना मफाकाला संघात समाविष्ट केलं आहे. क्वेना मफाका याने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली होती.
अलीकडेच शमीच्या उजव्या टाचांच्या समस्येवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सध्या तो बरा होत आहे. शमीच्या जागी घेतल्या संदीप वॉरियरने आतापर्यंत 5 आयपीएल सामने खेळले आहेत आणि त्याच्या मूळ किंमतीत म्हणजे 50 लाखात गुजरात टायटन्समध्ये सामील होईल.
दरम्यान, दिलशान मदुशंका दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. क्वेना माफाका या डावखुरा वेगवान गोलंदाजाला त्याच्या 50 लाखांच्या मूळ किमतीसाठी मुंबई इंडियन्समध्ये सामील करण्यात आलं आहे. नुकत्याच संपलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये क्वेना माफाका याने दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केलं होतं.
गुजरात टायटन्सचे सामने
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
७ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनऊ
मुंबई इंडियन्सचे सामने
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई.