WPL 2023 GG vs MI: वुमेंस महिला प्रीमीयर लीगचा (WPL 2023) पहिलाच सामना रंगला होता. सर्वांचा लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या सामन्यात बाजी मारत 143 रन्सने सामना जिंकला आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. यावेळी 208 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना गुजरात जाएंट्सच्या महिलांना नाकी-नऊ आल्या. 


गुजरातच्या महिलांना 64 रन्समध्ये गुंडाळलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

208 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाह करताना गुजरातच्या महिलांनी निराशाजनक कामगिरी केली. यावेळी दयालन हेमलता सोडून कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. यामध्ये गुजरातच्या तीन खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. गुजरातची कर्णधार बेथ मुनी रिटायर्ड हर्ट झाली. अखेर मुंबईच्या टीमने गुजरातच्या सर्व महिलांना 64 रन्समध्ये पव्हेलियनचा रस्ता दाखवला


गुजरात जाएंट्सच्या महिलांना 208 रन्सचं आव्हान


वुमेंस प्रिमीयर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या टीमचा बोलबाला दिसून आला. मुंबईच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांना धुतलं. 20 ओव्हर्समध्ये मुंबईने 207 रन्स केले. यावेळी मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने उत्तम फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. याशिवाय अमेलिया केर हिने नाबाद 45 रन्सची खेळी केली. तर ओपनर हीली मैथ्यूजचं अर्धशतक केवळ 3 रन्सने हुकलं. अखेर 5 विकेट्स गमावत गुजरातच्या महिलांना 208 रन्सचं टार्गेट देण्यात आलं.


हरमनप्रीत कौरची कॅप्टन इनिंग


पहिल्याच सामन्याच डीवाय पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौर नावाचं वादळ आलं होतं. हरमनप्रीतने गुजरातच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. कौरने 30 बॉल्समध्ये 65 रन्स केले. तिच्या या खेळीत 14 फोरचा समावेश आहे. वुमेंस प्रिमीयर लीगमध्ये पहिलं अर्धशतक झळकावणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.


गुजरात जाएंट्स टीमचं प्लेईंग 11


बेथ मूनी (कर्णधार), सब्बिनेनी मेघना, हरलीन देओल, एश्ले गार्डनर, एनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेयरहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी


मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11


हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नताली सीवर-ब्रंट, हीली मैथ्यूज, पूजा वस्त्रकार, इस्सी वोंग, हुमायरा काजी, अमेलिया केर, अमनजोत कौर, जिंतिमनी कलिता, सायका इशाक