मुंबई : यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात काही खास चांगली झालेली नाही. 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबईला यावेळी सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आज मुंबई इंडियन्स आणि रॉय चॅलेंजर बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना जिंकण्याचा पुरेपुर प्रयत्न मुंबई करणार आहे. यासाठी टीममध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचे संकेत टीमच्या कोचने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी कोच शेन बाँड यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या चौथ्या सामन्यापूर्वी टीममधील गोलंदाजांबाबत मोठा खुलासा केला आहे. लवकरच गोलंदाजांमध्ये बदल अपेक्षित होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.


शेन बाँड पुढे म्हणाले, हे सर्व ठीक करणं खूप सोपं आहे. जर आम्ही आमच्या योजनांवर ठाम राहिलो आणि त्यानुसार गोलंदाजी केली तर मला वाटतं तुम्हाला बदल दिसेल. मी म्हटलं तसं, आम्ही आमच्या योजनेत काही वेळा यशस्वी झालो. गेल्या सामन्यात आंद्रे रसेलविरुद्ध आम्ही चांगली गोलंदाजी केली.


व्यंकटेश अय्यरला आम्ही रोखून धरण्यात यशस्वी ठरलो होतो. दबावाखाली योग्य पद्धतीने गोलंदाजी करणं हे आमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे, ज्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो आहोत, असंही बाँड यांनी सांगितलंय.


Rohit Sharma ने दिलं मोटिवेशनल स्पीच 


सलग 3 पराभवांनंतर रोहितने त्याच्या टीमला प्रोत्साहन दिलं आहे. रोहित म्हणतो, पराभवासाठी आपण कोणाला जबाबदार ठरवू शकत नाही. यामध्ये आपण सर्व एकत्र आहोत, आपण एकत्र जिंकतो आणि पराभवंही एकत्रंच स्विकारतो. आपण टूर्नामेंटमधील 3 सामने हरलो याचा अर्थ असा नाही की आपण मान खाली घातली पाहिजे. कारण आता टूर्नामेंटमध्ये सुरुवातीचे दिवस आहेत.