Mumbai Indians IPL 2023: कोणालाही अपेक्षा नसताना मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) जोरदार मुसंडी मारत आयपीएलच्या प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) प्रवेश मिळवला. पहिल्या 7 सामन्यात 9 नंबर असलेल्या मुंबईने दमदार कमबॅक केलं. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आरसीबीचा पराभव केल्याने मुंबईने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात लखनऊचा दारूण पराभव केला आणि पुन्हा गुजरातला भिडण्यासाठी मुंबईचा मैदानात उतरला. मात्र, क्वॉलिफायर टू सामन्यात गुजरातकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागण्याने आता मुंबईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे. अशातच आता टाटा गुड बाय करताना मुंबईचे खेळाडू भावूक (MI Emotional Video) झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Mumbai Indians Instagram) ड्रेसिंग रूमचा एक व्हिडीओ (Dressing Room Video) शेअर केला. या व्हिडिओमध्ये स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर निराश दिसत आहे. आठवण म्हणून खेळाडूंनी एकमेकांच्या बॅटवर आणि जर्सीवर ऑटोग्राफ देखील घेतली. त्यावेळी प्लेयर्सला ड्रेसिंग रुम सोडताना ना दु:ख विसरता आलं नाही ना अश्रू लपवता आले. सूर्यकुमार यादव, इशान किशन तसेच कॅप्टन रोहित शर्मा याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.


आणखी वाचा - IPL 2023 Final: पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा; आता 'या' दिवशी रंगणार सामना!


मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. त्यावेळी त्यांनी मराठमोळ्या अंदाजात याला कॅप्टन दिलंय. जातो नाही, येतो म्हण असा मथळा या व्हिडिओला दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला दिसत आहे. पुढच्या वर्षी पुन्हा नव्या जोशाने मैदानात उतरण्याता निश्चय देखील यावेळी रोहित अँड कंपनीने केला आहे.


पाहा Video 



दरम्यान, आयपीएलचा फायनल सामना चेन्नई आणि गुजरात यांच्यात (GT vs CSK) खेळवला जात आहे. आज सामना खेळवण्यात आला होता. मात्र, पावसामुळे टॉस देखील होऊ शकला नाही. त्यामुळे आता सामना रिझर्व्ह डे (Reserve Day) म्हणजे राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. सोमवारी (29 मे रोजी) हा सामना रंगणार असल्याने आता वरूणराजा फायनलवर पुन्हा आपली कृपा बसरू नये, अशी इच्छा क्रिकेटचाहत्यांनी व्यक्त केलीये.