मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी २७ जानेवारीला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना टीममध्ये कायम ठेवण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी ४ जानेवारी ही अंतिम तारीख आहे. सगळ्या खेळाडूंना कायम ठेवता येणार नसलं तरी लिलावावेळी राईट टू मॅचचा वापर करून जुन्या खेळाडूंना पुन्हा विकत घेता येणार आहे.


कृणाल पांड्याला टीममध्ये कायम ठेवणं ही मुंबई इंडियन्सची रणनिती आहे. कृणालला टीममध्ये ठेवल्यामुळे मुंबईचा संघ लिलावावेळी पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहला लिलावावळी राईट टू मॅच कार्ड वापरून विकत घेऊ शकेल.


दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना टीममध्ये कायम ठेवलं तर टीमला २१ कोटी रुपये (पहिल्या खेळाडूसाठी १२.५ कोटी, दुसऱ्यासाठी ८.५ कोटी रुपये) खर्च करावे लागणार आहेत. तर तीन खेळाडूंना कायम ठेवलं तर ३३ कोटी रुपये(पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्यासाठी ११ कोटी आणि तिसऱ्यासाठी ७ कोटी रुपये) खर्च करावे लागतील.