मुंबई : मुंबई इंडियन्सने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांना मोठी भूमिका सोपवली आहे. मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आता आणखी दोन परदेशी लीगमधील टीम असल्याने झहीर खानला ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट आणि जयवर्धनेला ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MI साठी जागतिक क्रिकेटचा वारसा तयार करण्याच्या उद्देशाने मुंबई इंडियन्सच्या मालकांनी महेला जयवर्धने आणि झहीर खान यांना नवीन भूमिका सोपवल्या आहेत. MI चा विस्तार झाला असून त्यात आता मुंबई इंडियन्ससह MI Emirates आणि MI केप टाउनचा समावेश आहे.  युएईच्या लीगसाठी फ्रँचायझीचे नाव 'MI Emirates' असेल, तर केप टाउन लीगमध्ये 'MI cape town' अशी नावं असण्याची शक्यता आहे.


झहीर खानची एमआयच्या क्रिकेट डेव्हलपमेंटचे ग्लोबल हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जो खेळाडूंच्या डेव्हलपमेंटसाठी जबाबदार असेल. याशिवाय, कौशल्य ओळखणं आणि MI साठी एक मजबूत टीम तयार करणं त्यामागील हेतू आहे. झहीरची ही भूमिका जगभरातील MI टीमना मदत करण्यात महत्त्वाची ठरणार आहे.


महेला जयवर्धने यांची ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. तसंच प्रत्येक टीमच्या प्रशिक्षणाची जबाबदारी यासह क्रिकेट ऑपरेशन्सचं नेतृत्व देण्यात आलंय. 


सपोर्ट स्ट्रक्चर्स, टीमच्या मुख्य प्रशिक्षकांसोबत जवळून काम करणं, समन्वय सुनिश्चित करणं, क्रिकेटचा एक सातत्यपूर्ण ब्रँड आणि मुंबई इंडियन्सने सेट केलेल्या सर्वोत्तम पद्धतींची अंमलबजावणी करणं, अशी एकंदरीत भूमिका महेला जयवर्धनेची असणार आहे.